आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी; १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिल्या फेरीसाठीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवार, ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत बायफोकल आणि इतर शाखा यांची स्वतंत्र प्रवेश फेरी घेण्यात येत आहे. बायफोकलच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. 

 

११२ कनिष्ठ महाविद्यालये या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाली आहेत. यंदाची प्रवेश क्षमता २८ हजार ७३५ एवढी आहे. बायफोकल विषयासाठीची प्रवेश क्षमता ४ हजार ६५३ इतकी आहे. दि. ३० जून ते २ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या हरकती विहित नमुन्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयात नोंदवण्यात आल्या. आता या हरकतीनुसार निवारण प्रक्रिया मंगळवार, दि. ३ जुलै रोजी होणार आहे . गुरुवार, ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. यात जागा अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांनी ६ ते ९ जुलैदरम्यान महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे. १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागा आणि पहिल्या फेरीचा कट ऑफ जाहीर होईल.