आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट धनादेश प्रकरणातील पाच आरोपींचा ताबा वर्धा पोलिसांकडे; मुख्य आरोपी उत्तर प्रदेशात वाँटेड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बनावट धनादेश तयार करून देशभरातील १९ बँकांतून कोटींची रक्कम मिळवणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना शुक्रवारी वर्धा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वर्धा येथील स्टील व्यावसायिकाला त्यांनी पाच लाखांचा गंडा घातल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, यातील मुख्य आरोपी ओमप्रकाश श्रीवास्तव, राकेश यादव हे दोघेही उत्तर प्रदेशात वाँटेड असून तेथील तारनपूर पोलिसही चौकशीसाठी शहरात येणार आहेत. 


२८ जून रोजी गुन्हे शाखेने हा घोटाळा उघडकीस आणला. यात हरीश गोविंद गुंजाळ (३९, रा. सिंधुदुर्ग), मनीषकुमार जयराम मौर्या ऊर्फ राकेश ऊर्फ मनीष रामलाल यादव(२३, रा. उत्तर प्रदेश), मनदीपसिंग बनारसीदाससिंग (२९, रा. पंजाब), रशीद इम्तियाज खान (२०, रा. पालघर) आणि डब्ल्यू शेख अरमान शेख (३२, रा. पश्चिम बंगाल)यांना अटक झाली. त्यापैकी गुंजाळ वगळता उर्वरित सर्वांना वर्धा पोलिसांकडे शुक्रवारी हस्तांतरित करण्यात आले. त्यांनी वर्ध्यातील एका स्टील व्यावसायिकाच्या नावाने पाच लाखांचा धनादेश कराड मधील मलकापूर बँकेत टाकून ती रक्कम मिळवली हाेती. त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोपींना वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल वाघ तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...