आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या पॅनलमधून लढले तर पक्ष जिल्ह्यात वाढणार कसा? ईश्वरलाल जैनांचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मी राष्ट्रवादीचे पॅनल उभे केले असताना अापल्याच पक्षाचे नेते एकनाथ खडसेंच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलमधून लढले. इतर निवडणुकांमध्ये देखील पक्षातील गटबाजी, छुप्या सेटलमेंट कुणापासून लपून राहिलेल्या नाहीत. पक्षात मी स्थान दिलेले लाेकच माझी बदनामी करतात, अशा चुकीच्या वागण्यामुळे अापला पक्ष कसा वाढेल? असा प्रश्न उपस्थित करत माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी पक्षातील छुप्या सेटलमेंटवाल्यांचे कान उपटले. दरम्यान, अापण शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष व शरद पवार यांच्याशी जाेडलेले राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा कार्यालयात रविवारी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात अाले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माजी मंत्री गुलाबराव देवकर, कापूस पणन महासंघाचे संचालक संजय पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, राजेश पाटील, महानगर अध्यक्षा नीला चाैधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. ध्वजवंदन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी माजी खासदार जैन यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेतृत्व करून सक्रिय हाेण्याचा अाग्रह केला. यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी खासदार जैन यांनी मनातील खदखद बाहेर काढली. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही त्यांची भूमिका मांडली. जामनेरमध्ये पालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मला विश्वासात घेतले जात नाही. माझ्या गावात माझ्या विराेधात असणाऱ्यांचे व अामदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न कधीच पूर्ण हाेऊ देणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. 


नेत्यांनी ठाेकला तळ 
पक्षाच्या दाेन माजी पदाधिकाऱ्यांत ध्वजवंदन कार्यक्रमानंतर जाेरदार शाब्दिक चकमक झाली. दाेन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला वाद साेडवण्यासाठी पक्षाची काही नेतेमंडळी पक्ष कार्यालयात तबब्ल दाेन तास तळ ठाेकून हाेते. 

 

बातम्या आणखी आहेत...