आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजमधून चार तलवारी जप्त; तरुण घरात बनवत होता अवैध हत्यारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे तलवारी तयार करून विक्री करणाऱ्या तरुणाला रविवारी पोलिसांनी अटक केली. इरफान युसूफ शेख (२८) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चार धारदार तलवारी जप्त केल्या. 


तेरा दिवसांपूर्वी फ्लिपकार्टवरून मागवलेला मोठा शस्त्रसाठा शहर पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर पोलिस शस्त्र बनवून विकणाऱ्यांच्या मागावर होते. जोगेश्वरी येथे एक तरुण तलवार तयार करून देत असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस जमादार विजय होनवडजकर, शैलेंद्र अडियाल, बाळासाहेब आंधळे, देविदास इंदोरे, बाबासाहेब काकडे यांच्यासह विशेष पोलिस अधिकारी अंबादास प्रधान यांच्या पथकाने रविवारी सकाळी जोगेश्वरी झोपडपट्टीत छापा टाकला. तेव्हा एका घरात इरफान शेख तलवारी बनवत असल्याचे दिसले. इरफानला अटक करून त्याच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...