आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ला टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, दिव्य मराठीतर्फे उद्या नि:शुल्क वंध्यत्व, चिकित्सा शिबिर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सेव्हन हिल्स मोतीवालानगर येथील प्रसिद्ध जिल्ला टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि दै. दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने नि:संतान दांपत्यांसाठी नि:शुल्क वंध्यत्व मार्गदर्शन (कन्सल्टेशन) व चिकित्सा भव्य शिबिराचे मंगळवार, ता. २६ जून २०१८ रोजी दुपारी १ ते सायं ५ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या भव्य शिबिरात पूर्वी आयव्हीएफ अयशस्वी झालेल्या जोडप्यांसाठी विशेष मार्गदर्शन होणार आहे. 


या उक्तीला जागून खास लोकहितार्थ या शिबिराचे आयोजन जिल्ला टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, जिल्ला हॉस्पिटल, ८४ मोतीवालानगर, सेंट्रल नाका रोड, औरंगाबाद येथे केले आहे. याचा लाभ संबंधितांना घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. येथील जिल्ला हॉस्पिटलने औरंगाबादमध्ये अत्याधुनिक, रुग्णांना अनुकूल वंध्यत्व केंद्राची स्थापना केली आहे. जिल्ला आयव्हीएफ क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड यांची औरंगाबाद आणि मुंबई येथे शाखा (ब्रँच) आहे. 


हे क्लिनिक वंध्यत्व उपचारांसाठी नवीनतम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि आयव्हीएफच्या क्षेत्रात योग्यता असलेली एक टीम आहे, जी आपल्या पालकत्वाच्या दिशेने असलेल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे या शिबिरात नि:संतान दांपत्यांनी मार्गदर्शन (कन्सल्टेशन) चिकित्सा घेऊन आपले शंका- समाधान करून घ्यावे व या संधीचा लाभ घ्यावा. 


शिबिराला येताना रुग्णांनी आपली पूर्वीच्या उपचारांच्या फाइलची झेरॉक्स कॉपी सोबत न विसरता आणावी, या शिबिरात सल्ला व मार्गदर्शनासह नावनोंदणीसाठी मो. ८८८८८८००४३, ८०९७९४३९४३ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

बातम्या आणखी आहेत...