आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथरोगावर खासगी रुग्णालयात आयएमए करणार मोफत उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात कचऱ्यांच्या वाढल्या समस्येमुळे साथरोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) तसेच खासगी हॉस्पिटलची महापालिका मदत घेणार आहे. मोठ्या प्रमाणात साथरोग उद्भवल्यास अथवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास खासगी रुग्णालात नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) ने तयारी दशर्वली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून यांच्यासह घाटीची मदत घेतली जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

 

कचऱ्यामुळे वाढलेले डास, माशा यांची परिस्थिती लक्षात घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या दालनात शनिवारी साथरोग नियंत्रणासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमहापौर विजय औताडे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. प्रदीप बेंजरगे, डॉ. उज्ज्वला दहिफळे, हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. व्ही. एस. भटकर, अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मलेरिया विभागप्रमुख डॉ. अर्चना राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी झालेल्या चर्चेत वरील निर्णय घेण्यात आले. तसेच रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी नियंत्रण कक्ष उघडले जातील. पावसाळा आणि त्यातच कचऱ्यामुळे डास व माशांची उत्पत्ती अधिक होत आहे. करिता औषध फवारणीची जबाबदारी हिवताप नियंत्रण विभागाकडे देण्यात आली आहे.

 

आतापर्यंत ५७ रुग्णांवर मोफत उपचार : अायएमए आणि मनपाकडून हा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी मागील महिन्यात ३२ आणि या महिन्यात २२ गॅस्ट्रोच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यानंतर मनपाकडून पाठवण्यात आलेल्या रुग्णांना तसेच उद््भवलेल्या साथरोगाच्या परिसरातील रुग्णांना ही सुविधा मिळणार आहे.

 

घाटी, खासगी रुग्णालयांची मदत
शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन आयएमए, घाटीची मदत घेत साथरोगांच्या रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज खासगी रुग्णालयांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यामुळे नागरिकांना आणि रुग्णांना लाभ होईल.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी, मनपा

 

आजपासून उघड्यावरील मांस विक्रीवर कारवाई : पावसाळ्यात आणि त्यातल्या त्यात कचराकोंडीमुळे आता उघड्यावरील मांस नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे रविवार, १५ जुलैपासून उघड्यावरील बेकायदा मांसविक्री बंद करण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे महापौरांनी पालिका प्रशासनाला आदेशित केले. तसेच
रुग्णांना जवळच सुविधा मिळेल

 

रुग्णालयासह १८ हॉस्पिटल
मनपाच्या नऊ प्रभागांत प्रत्येकी दोन अशा एकूण १८ रुग्णालयांत साथीचे रोग अथवा आपत्कालीन परिस्थितील रुग्णांना येथे सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी अॅडमिट करून घेण्यासह पुरवण्यात आलेल्या इतर सुविधांचा खर्च आयएमए आणि मनपा मिळून करणार आहे. सध्या एमजीएम, हेडगेवार रुग्णालयाचे नाव समोर आले आहे. उर्वरित हॉस्पिटलची यादी तीन दिवसांत प्रसिद्ध करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...