आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून इज्तेमा, उर्दू शाळांना साेमवारी सुटी; 63 देशातील मुस्लिम बांधव सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद/मुंबई-  मुस्लिम धर्मीयांचा पवित्र साेहळा असलेल्या अांतरराष्ट्रीय तब्लिगी इज्तेमा  २४ ते  २६ फेब्रुवारी दरम्यान अाैरंगाबाद जिल्ह्यातील लिंबेजळगाव येथे हाेत अाहे. या साेहळ्यात ६३ देशातील मुस्लिम बांधव सहभागी हाेणार अाहेत. शनिवारी पहिल्या दिवशी ८ लाख लाेक येतील असा अायाेजकांचा दावा अाहे. 


या इज्तेमानिमित्त शहर व परिसरात वाहतुकीची चोख व्यवस्था ठेवण्यात आली असून या मार्गावर हजाराे स्वयंसेवक हे काम पाहत अाहेत. याशिवाय विनामूल्य वाहन सेवा, ९० लाख चौरस फुटाचा भव्य मंडप, जेवणाचे विविध झोन, रुग्णालये आणि डॉक्टरांची सोय, पाण्याची व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

दरम्यान, या कार्यक्रमाच्या समाराेपाला साेमवारी राज्यातील सर्व उर्दू शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली. तसेच एसटी महामंडळ व रेल्वेच्या वतीने राज्यातून विशेष गाड्यांचीही साेय करण्यात अाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...