आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रेकरूंना फसवणारा सौदी पोलिसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उमरा यात्रेचे आयोजन करतो, असे सांगून शहरातील भाविकांकडून पैसे जमा करुन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी फसवणूक झालेल्या यात्रेकरुंचे जबाब नोंदवण्यास बुधवारी सुरुवात केली. जबाब नोंदणीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, शहरातील सुमारे ५० भाविक याच कंपनीने मक्का येथे उमरा यात्रेसाठी नेले. ते देखील त्याच ठिकाणी या कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे अडकले आहेत. सौदी पोलिसांनी ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक रफिक अब्दुल कय्युम खान ऊर्फ मौलाना (४०, रा. नारेगाव ) याला ताब्यात घेतल्याची माहिती मक्का येथे अडकलेल्या यात्रेकरुंनी त्यांच्या नातेवाइकांना दिली. ़


दरम्यान, मंगळवारी याबाबत गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत होते. मात्र 'दिव्य मराठी'त हे वृत्त प्रसिद्ध होताच फसवणूक झालेल्या यात्रेकरुंनी व त्यांच्या नातेवाइकांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठत कारवाईची मागणी केली. त्यामुळे गुन्हा दाखल झाला. दरम्यान, सौदी येथे अडकलेल्या शहरातील भाविकांना तेथील सरकार मदत करत असून तेच त्यांना भारतात पाठवणार असल्याची माहिती अजर काझी यांनी दिली. रफिक मौलानाचा पासपोर्ट देखील सौदी सरकारने जप्त केल्याची माहिती यात्रेकरुंनी दिली. दरम्यान, जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन फसलेल्या यात्रेकरुंना दिले. रफिकचा भाऊ हा यात्रेकरुंना विमानतळावर सोडून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...