आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल साकारणार वेरूळ-अजिंठ्याच्या थ्रीडी आभासी प्रतिकृती, लेणी बघण्यापूर्वी मिळणार संपूर्ण माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अखत्यारीतील वास्तूंच्या फिरत्या थ्रीडी प्रतिकृती तयार होणार आहेत. गुगलच्या मदतीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. वेरूळ-अजिंठा लेणीसह अन्य वास्तूंत प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांना त्याची खडान््खडा माहिती मिळावी, हा याचा उद्देश आहे. थ्रीडी इमेजसाेबत त्याची माहिती देणारे निवेदनही सुरू असेल. या प्रतिकृती पर्यटन खात्याच्या 'इनक्रेडिबल इंडिया' या वेबसाइटवर तसेच मोबाइल अॅपवरही उपलब्ध असतील. 

 

दररोज लाखो पर्यटक देशभरातील पुरातन वास्तूंना भेट देतात. मात्र, परदेशातील वास्तूंच्या धर्तीवर येथे त्यांना तंत्रज्ञानावर आधारित सुविधा मिळत नाहीत. यामुळे पर्यटक संख्येवर मर्यादा पडतात. या वास्तूंच्या संगणकीकृत थ्रीडी इमेज उपलब्ध असल्या तर त्या अधिकाधिक पर्यटकांना बघता येतील. त्यांची ओढ निर्माण होऊन पर्यटकांचा ओघ वाढेल, असा एएसआयला विश्वास वाटतो. यामुळे एएसआयअंतर्गत येणाऱ्या वास्तूंच्या आभासी प्रतिकृती म्हणजेच व्हर्च्युअल इमेज तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रतिकृती तयार करण्याची जबाबदारी गुगलकडे देण्यात आली आहे. या इमेजसोबत हिंदी, इंग्रजी, जपानी अशा सहा भाषांत निवेदन सुरू राहील. यामुळे प्रत्यक्ष वास्तूत फिरत असल्याचा आभास पर्यटकांत निर्माण होईल, असे एएसआयच्या सूत्रांनी सांगीतले. सहा महिन्यांत काम पूर्णत्वास जाईल. 


देशातील पर्यटनस्थळांच्या 'मस्ट सी'साठीही गुगलचे सहकार्य 
देशातील ऐतिहासिक वास्तूंच्या प्रचार, प्रसारासाठी एएसआयने 'मस्ट सी' स्थळांची यादी तयार केली असून यात नुकताच मेळघाटातील गाविलगड आणि लोणारच्या १५ पुरातन मंदिरांचा समावेश करण्यात आला अाहे. यामुळे 'मस्ट सी' यादीत महाराष्ट्रातील वेरूळ, अजिंठ्यासह ६ स्थळांना स्थान मिळाले आहे. या यादीत संबंधित स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व, स्थापत्यकला, पोहोचण्याचे रस्ते, हवाई आणि रेल्वे मार्ग, ऋतू, वेळा, निवास व्यवस्था, जवळपासची बघण्याची ठिकाणे, तिकीट, संबंधित अधिकाऱ्याचा क्रमांक, महत्त्वाच्या सुविधा आदी माहितीचा समावेश आहे. यासाठी एएसआयने गुगलच्या सहकार्याने पुरातन वास्तूंचे ३६० अंशांतील पॅनोरॅॅमिक छायाचित्र वेबसाइटवर घेतले आहे. सर्वच छायाचित्रे आकर्षक आहेत. 

बातम्या आणखी आहेत...