आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणीत २१ वर्षीय ग्रामपंचायत शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांत नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- ग्रामपंचायत शिपायाने राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लोणी बु. येथे घडली. या शिपायाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. 


राजू एकनाथ पवार (२७ रा. लोणी बु.) असे या आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. वैजापूर तालुक्यातील लोणी बु. येथील ग्रामपंचायतीमध्ये राजू पवार हा शिपाई आहे. राजू गुरुवारी दुपारी शहरात काही कामासाठी आला होता. काम आटोपल्यावर घरी गेल्यावर त्याने छताला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. 


दुपारी ३ वाजेला त्याच्या पत्नी व आईने तो छताला साडीत लटकलेला असल्याचे पाहिल्यावर आरडाओरड केली. त्यानंतर पोलिस पाटील प्रभाकर इंगळे व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला खाली घेत तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून तो मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर हवालदार जी.यु.थोरात, शुक्ल बनकर यांनी रुग्णालयात जावून पंचनामा केला. आत्महत्या केलेल्या राजूची ग्रामसेवक बनण्याची इच्छा होती. त्यासाठी तो ग्रामपंचायतीत काम करून आपले शिक्षण पूर्ण करत होता. मागील दोन महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झालेला होता. राजू पवार यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...