आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाचारसंहितेनंतर करवाढीसह 'संबंधितां'चा बंदाेबस्त; पालकमंत्र्यांचे भाजप नगरसेवकांना सूचक अाश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लिबर्टी लाेटस इमारतीला अालेल्या लाखाे रुपयांच्या देयकाचे उदाहरण देत शहरातील करवाढ रद्द न झाल्यास भाजपची स्थिती बिकट हाेईल, अशी कैफियत महापाैरांसह नगरसेवकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडल्याचे वृत्त अाहे. त्यावर 'विधानपरिषद निवडणुकीची अाचारसंहिता संपली की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील', असे सांगत पालकमंत्र्यांनी अाश्वस्त केल्यामुळे निवडणुकीनंतर नेमके काय हाेणार याची उत्सुकता वाढली अाहे. 


महापालिका क्षेत्रातील माेकळ्या जमिनींना ३ पैशांएेवजी ४० पैसे प्रति चाैरस फूट प्रतिमहा याप्रमाणे, तर निवासी क्षेत्रासाठी १ एप्रिल २०१८ नंतर अस्तित्वात येणाऱ्या नवीन मिळकतींच्या करयाेग्य मूल्यात पाच ते सातपट वाढ करण्यात अाली. याखेरीज जुन्या मिळकतींचे करयाेग्य मूल्य १८ टक्क्यांनी निवासी क्षेत्रासाठी वाढवले असले तरी, प्रत्यक्षात हाती पडणाऱ्या देयकामध्ये मागील रकमेत व अाताच्या रकमेत ४० टक्क्यापर्यंत वाढ दिसत अाहे. या तुघलकी करवाढीमुळे भाजपविराेधात असंताेष असून हे सर्व करणारे महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे मात्र सध्या 'वाॅक विथ कमिशनर'सारख्या कार्यक्रमांतून पब्लिक हिराे हाेताना दिसत असल्याची बाब नगरसेवकांना बाेचत अाहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेसाठी मंगळवारी महापाैरांसह भाजपचे सर्व नगरसेवक पालकमंत्र्यांकडे गेले हाेते. त्यावेळी त्यांनी करवाढीवरून शहरातील असंताेषाचे वातावरण, पक्षाची हाेणारी बदनामी, महापाैरांपासून नगरसेवकांपर्यं सर्वांना मिळणारी दुय्यम वागणूक याबाबत तक्रारी केल्या. त्यावेळी पालकमंत्र्यांनी विधान परिषद निवडणुकीची अाचारसंहिता संपल्यानंतर सर्व प्रश्नांची सूचक उत्तरे मिळतील असे अाश्वासन दिल्याचे वृत्त अाहे. 


'लिबर्टी लोटस'ला ६६ रुपयांचा दर 
गंगापूररोडवरील लिबर्टी लोटस इमारतीला सन २०१२ मध्ये बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला; मात्र घरपट्टी सुरू झालेली नव्हती. त्यांच्याकडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला पूर्वीचा असला तरी, १ एप्रिल २०१८ पासून लागू झालेले नवीन दर त्यांना लागू झाल्याचे चित्र अाहे. संबंधित इमारत कागदाेपत्री कधी पूर्ण झाली हे महत्त्वाचे नसून घरपट्टी रेकाॅर्डवर अाता अाल्यामुळे त्यांना नवीन दर लागू झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे इमारतीला साडेपाच रुपये प्रति चौरस फूट या जुन्या दराएेवजी ६६ रुपये प्रति चौरस फूट या नवीन दराने घरपट्टी लागू झाल्याचे चित्र अाहे. एकप्रकारे नवीन दराची अंमलबजावणीही प्रशासनाने सुरू केल्याचे चित्र अाहे. शिवाय, इमारतीतील जागेची माेजणी तांत्रिकएेवजी सर्वसाधारण कर्मचाऱ्यांकडून करून घेतल्याचे सांगितले जाते. 


करवाढीचा प्रभाव कसा पडत नाही हे काेडेच... 
पहिल्यांदा प्रभाग क्रमांक १३ मधील पाेटनिवडणुकीत करवाढीची अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे मतदारांवर प्रभाव पडला नाही. अाता विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना जिझिया स्वरूपाच्या करअाकारणीला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांवर त्याचा परिणाम हाेऊन महापालिकेत येत असतानाही त्याचा प्रभाव कसा पडत नाही या म्हणण्याचे नगरसेवकांनाही काेडेच वाटू लागले अाहे. एकप्रकारे, प्रशासकीय दडपशाहीचाच हा प्रकार असून निवडणूक अायाेगाकडूनही दखल घेतली जात नसल्यामुळे दाद मागायची काेठे, असाही प्रश्न पालिकेत विचारला जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...