आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडिमेड गुढी खरेदी करण्याची क्रेझ वाढली, मोठ्या प्रमाणात होतेय विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. या सणासाठी बाजारात आता रेडिमेड गुढी सर्वांचे लक्ष वेधत आहे. तीन -चार वर्षांपासून आपल्या कार्यालयासह घरात एक ते दीड फुटांपर्यंतची आकर्षक गुढी बघायला मिळते. सध्या रेडिमेड गुढी खरेदी करण्याची क्रेझ वाढत चालली आहे. 

 

मराठी नववर्षाची सुरुवात मराठी सण असलेल्या गुढीपाडव्यापासून सुरू होतो. या दिवशी घरात गुढी उभारण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. ह्या दिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्तासे लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ ही गुढी उभारली जाते. यंदा बाजारात रेडिमेड गुढी विक्रीला आल्या आहेत. गुलमंडी, सुपारी हनुमान मंदिर या बाजारपेठेत सध्या गुढीपाडव्यानिमित्ताने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. एकीकडे इलेक्ट्रॉनिक्स दुकानांवर, तर दुसरीकडे विविध वस्तूंची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. गुढीपाडवा रविवारी असल्याने खरेदीचा वेगही वाढणार आहे. मांगल्याचे प्रतीक असलेली ही गुढी ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत मिळत आहे. या गुढीला जरीचे कापड, लहान आकारातील पितळी तांब्या आहे. टेबलवर सहजरीत्या गुढी उभी राहण्यासाठी त्याला लाकडी स्टँड तयार करण्यात आलेले आहे. आठ दिवसांत या प्रकारची गुढी मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे विक्रेता गणेश काथार यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...