आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील कचरा कन्नड गायरानात टाका, आमदार हर्षवर्धन जाधव यांची मनपाला ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी साठलेला २० हजार आणि रोज निर्माण होणारा ३०० टन कचरा कन्नडजवळच्या ५० एकर गायरानात टाका, अशी ऑफर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महापालिकेला दिली आहे. त्यानुसार रविवारपासून (१५ जुलै) कचरा नेऊन टाकण्याची तयारी केली आहे.


१६ फेब्रुवारी रोजी नारेगाव येथील डेपो तेथील आंदोलकांनी बंद केल्यापासून कचरा नेमका कुठे टाकावा, असा प्रश्न महापालिकेपुढे होता. प्रशासनाने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथे कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. पण आजूबाजूला पाण्याचे स्रोत, नागरी वसाहती असल्याने लोकांनी प्रचंड विरोध केला. शिवाय आधी प्रक्रिया प्रकल्प उभे करा आणि नंतर कचरा आणा, असेही लोकांचे म्हणणे होेते. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी स्वत: पुढाकार घेत गायरानाचा वापर करा, असे म्हटल्याने महापालिकेने त्याचे स्वागत केले. जाधव यांनी शनिवारी महसूल, मनपाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जागेची पाहणी केली.

 

जाधव म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझा मुलगा आजारी पडला. शहरात जागोजागी पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळेच त्याला आजारपण आले.  अशी स्थिती इतरांची होऊ नये म्हणून मी कन्नडजवळची जागा कचरा डेपोसाठी देऊ केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...