आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने राज्यात ६ ते ९ जुलै या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे. या काळात जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 


पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार ६ ते ७ जुलै या काळात मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल. रविवारी (८ जुलै) विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ९ जुलैला महाराष्ट्र व विदर्भात जोरदार, तर मराठवाड्यात बऱ्याच जागी पावसाची शक्यता आहे. या काळात कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. 


हवामान खात्याकडून १६ राज्यांत अलर्ट जारी 
हवामान खात्याने १६ राज्यांत शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, गुजरात, तेलंगण, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अासाम, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरामचा समावेश आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...