आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड-परळीत पावसाचा धुमाकूळ; वादळाने घरावरचे पत्रे उडाल्याने अनेक जखमी, वीज पुरवठा खंडीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- शहर व तालुक्यात शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान सोसाट्याच्या वार्‍यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडला. वा-याचा वेग जास्त असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणच्या घरावरील पत्रेही उडून गेली आहेत. धारावती तांडा येथे काही जणांना घरावरील पत्रे उडाल्याने इजा झाली असून, त्यांना परळी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

तालुक्यात झालेल्या नुकसानीबाबत महसूल प्रशासन अधिकची माहिती घेत असून, तलाठी सजांना याबाबत तात्काळ माह्ती कळविण्याचे आदेश तहसिलदार शरद झाडके यांनी दिले आहेत. तालुक्यातील धरावती तांडा येथे चिमाजी तुकाराम राठोड आजच्या वार्‍यात पत्रे उडाल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. तर ग्रामिण भागात व शहरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने विजेचा पुरवठा खंडीत झाला आहे. दिवसभरात निर्माण झालेल्या उकाड्याने अंगाची लाही लाही होत असताना दुपारी 4 च्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यानंतर विजेचा पुरवठा खंडीत झाला असल्याने नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील बरकतनगर, इंदीरानगर, रहमतनगर, मिलींदनगर, भिमवाडी, ईराणी वस्ती, वडार कॉलनी, शंकर पार्वती नगर येथे काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या असल्याची माहीती मिळत आहे.

 

पुढील स्लाईडवर पहा पत्रे उडाल्याने जखमी झालेल्यांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...