आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूंनी भरपूर मुले जन्माला घालावीत; मुले सांभाळणे शक्य नसेल तर माझ्याकडे द्या-प्रज्ञासिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राष्ट्र वाचवण्यासाठी हिंदू धर्म, संस्कृती जगली पाहिजे. म्हणून हिंदूंनी भरपूर मुले जन्माला घालावीत.  ५ वर्षांची मुले सांभाळणे तुम्हाला शक्य नसेल तर माझ्याकडे द्या, असे वक्तव्य  साध्वी प्रज्ञासिंह यांनी सोमवारी अाैरंगाबादेत केले. ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावरील व्याख्यानात त्या म्हणाल्या, राष्ट्रविघातक विचारधारेने पुन्हा जोर पकडला आहे. दुसरीकडे संस्कृतीचे विकृतीकरण सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी हिंदू धर्मातील लाेकांना पुढाकार घ्यावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...