आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात उष्णतेची लाट, 18 जिल्ह्यांत पारा चाळिशी पार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विदर्भात उष्णतेची लाट आली अाहे.  शुक्रवारी महाराष्ट्रातील १८ हून अधिक जिल्ह्यांत पारा ४० अंशांवर पोहोचला.  विदर्भात सर्वच जिल्ह्यांत तापमान ४१ अंशांवर नोंदले गेले. चंद्रपूरमध्ये ४५.९ अंशांसह सलग तिसऱ्या दिवशी देशात सर्वाधिक तापमान होते.

 

मराठवाडा, द. महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातही तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली. मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत तापमान ४० अंशांवर राहिले. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विदर्भात उष्णतेची लाट आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भात दोन दिवसांपासून उष्णतेची लाट असून ती रविवार (२२ एप्रिल) पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात रविवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी (२४ एप्रिल) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


प्रमुख शहरांतील तापमान :
- चंद्रपूर ४५.९ 

- अकोला ४२.६ 

- अमरावती ४१.८

- नागपूर ४४.२    
- यवतमाळ ४२.५

- परभणी ४३.८ 

- नांदेड ४३

- बीड ४२

- औरंगाबाद ४०.२

- जळगाव ४२.८

- नगर ४१

बातम्या आणखी आहेत...