आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 सीसीटीव्हींची नजर चुकवून सिंधी कॉलनीत बंगला फोडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील मित्रनगर भागात निवृत्त महसूल उपायुक्ताचे घर फोडले. विशेष म्हणजे या बंगल्यातील आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर चुकवून आणि आणि दोन लोखंडी दरवाजे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. भगवान वामनराव लांडगे (६७) असे घरमालकाचे नाव आहे.

 

लांडगे यांचा मित्रनगरात १९ नंबरचा कौतुक नावाचा बंगला आहे. त्यांचा मुलगा पुण्यात एल अँड टी कंपनीत सहायक व्यवस्थापक आहे. त्याला भेटण्यासाठी लांडगे काही दिवसांपूर्वी पुण्याला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घर फोडले. या महिन्यातील १५ पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक शरद इंगळे, गुन्हे शाखचे उपनिरीक्षक जारवाल आणि अनिल वाघ यांच्या पथकाने पाहणी केली. ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला या वेळी बोलावण्यात आल होते.

 

सीसीटीव्हीचे वायर कापले
लांडगे यांनी बंगल्यात ८ सीसीटीव्ही लावले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार चोरटे पहिल्यांदा शेजारच्या बंगल्याच्या गच्चीवर गेले. तेथून बेडशीट घेतली. तोंड झाकून गच्चीवरील सीसीटीव्हीचे वायर तोडले. त्यानंतर दरवाजा तोडत आत प्रवेश केला. खाली आल्यानंतर एक सीसीटीव्ही तोडला. आत प्रवेश करत कपाटातील २५ हजार रुपयांचा साड्या आणि १५ हजार रुपये रोख घेऊन गेले.

 

बातम्या आणखी आहेत...