आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावे ते नवलच: नांदेडच्या तरूणाने एकाच मांडवात दोन तरूणींशी रचला विवाह!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेडमधील एका तरूणाने एकाच मांडवात दोन तरूणींशी बुधवारी लग्न केले - Divya Marathi
नांदेडमधील एका तरूणाने एकाच मांडवात दोन तरूणींशी बुधवारी लग्न केले

नांदेड- नांदेडमधील एका तरूणाने एकाच मांडवात दोन तरूणींशी लग्न केले आहे. बुधवारी (2 मे) रोजी हा विवाह पार पडवा. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडीजवळील माचनुर येथे हा अनोखा विवाहसमारंभ पार पडला. विशेष म्हणजे हा विवाह पै-पाहुणे व वधू-वराच्या आई-वडिल व नातेवाईकांसह मोठ्या आनंदात झाला.

 

त्याचं झालं असं की, नांदेडमधील बिलोली तालुक्यातील कोटग्याळ येथील गंगाधर शिरगिरे यांना चार मुली आहेत. त्यातील थोरली धुरपतबाई अशंत: मतीमंद आहे. तर दुसरी राजश्री मुलगीही उपवर झाल्याने त्यांच्या लग्नाची चर्चा घरात सुरू झाली. मात्र, येणारी लोक थोरल्या धुरपतबाईऐवजी दुसरी मुलगी राजश्रीला मागणी घालू लागले. काही महिने हा प्रकार सुरू राहिल्याने मतीमंद धुरपतबाईचे लग्न कसे होणार याची चिंता आई-वडिलांना पडली. हे सर्व दुसरी मुलगी राजश्री जवळून पाहत होते. राजश्रीला आपल्या थोरल्या बहिणीचे वाईट वाटे तर आई-वडिलांच्या डोळ्यातील चिंता दिसायची.

 

अशातच धर्माबाद तालुक्यातील समराळा गावातील सायन्ना उरेकर यांचा मुलगा साईनाथ या तरूणाचे स्थळ आले. त्यांनीही थोरल्याऐवजी धाकटी मुलगी राजश्री द्या अशी मागणी घातली. मात्र, दुसरी मुलगी राजश्रीने या साईनाथला एक अट घातली. जर माझ्याशी लग्न करायचे असेल तर थोरली बहिण धुरपतबाई हिलाही स्वीकारावे मग मी तुमच्याशी लग्न करेन असे सांगितले. यावर साईनाथ व त्याच्या कुटुंबियांनी विचार करून राजश्री व तिच्या आई-वडिलांना होकार कळविला. दोन्ही कुटुंबिय व त्यांचे नातेवाईकही त्यास तयार झाले.

 

मग काय 'मिया बीबी राजी, फिर क्या करेगा काझी' या म्हणीप्रमाणे या विवाहाची जोरदार तयारी सुरू झाली. विवाह पत्रिका छापल्या त्यातही दोन वधू व एक वर असा नावासह उल्लेख करण्यात आला. 2 मे रोजी म्हणजेच बुधवारी हा विवाह थाटामाटात पार पडला. साईनाथ या तरूणाने एकाच मांडवात दोन बहिणी धुरपतबाई व राजश्री यांच्या गळ्यात माळ घातली. तर दोघी सख्ख्या बहिणींनी सर्वांसमक्ष साईनाथसोबत पती म्हणून सात फेरे घातले. या लग्नाला दोन्ही परिवाराचे नातेवाईक, पाहुणे मंडळी झाडून हजर होती. माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी सुद्धा उपस्थित नववधू-वरास आशीर्वाद दिले. मतीमंद मोठया बहिणीशी विवाह करण्यास कोणी राजी होत नसल्याने धाकटी राजश्रीने मनाचा मोठेपणा दाखवत समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित बातमी....

बातम्या आणखी आहेत...