निवडणुका आल्या की / निवडणुका आल्या की औरंगाबादेत दंगल का होते? हुसैन दलवाई यांचा सवाल

दिव्य मराठी वेब टीम

May 16,2018 07:22:00 PM IST

औरंगाबाद- निवडणुका जवळ आल्या की औरंगाबादेत दंगल का होते, याचा शोध घेतला पाहिजे, प्रत्येक वेळी असेच होत आले आहे, यावेळी पोलिसांच्या मदतीने एका समाजावर हल्ला करण्यात आल्याचे दिसून येते. येथे पोलिसांनी वर्दी काढून ठेवली होती. असा आरोप काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसैन दलवाई यांनी केला.

दलवाई यांनी बुधवारी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ही दंगल घडवून आणण्यात आली आहे. येथे खासदार चंद्रकांत खैरे हे दंगल भडकवताना दिसतात. तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. ज्यांच्या घराची हानी झाले, ज्यांचे कुटुंबीय या दंगलीत गमावले, त्यांच्याच घरात जावून पोलिसांनी कोबिंग आॅपरेशन केले. हा प्रकार दुर्दैवी असून पोलिसांनी आपली वर्दी काढून ठेवली असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील दंगलीला चार दिवस लोटले तरी राज्याचे गृहमंत्री येथे आले नाहीत. गृहखाते हे स्वत: मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे त्यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करायला हवी होती असेही दलवाई यांनी सांगितले.

X
COMMENT