आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिल ऑनलाइन भरल्यास आता अतिरिक्त शुल्क माफ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑनलाइन वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढावी यासाठी आता क्रेडिट कार्ड वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने बिल भरणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.

 

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व मोबाइल अॅपद्वारे वीज देयकांचा ऑनलाइन भरणा करता येतो. केवळ क्रेडिट कार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. तर नेट बँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्डने वीज देयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे त्वरित पोहोच मिळेल. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास वीज बिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाइन वीज बिल भरणा पद्धत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहकांनी helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...