आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी पूर्व सातवा वेतन अायोग लागू करण्याचा विचार- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी आमदार विक्रम काळे यांनी वित्त मंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्याची तातडीने दखल घेण्यात आली असून आ. काळेंना लिहिल्या उत्तरात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समितीचा अहवाल ४ महिन्यांत शासनाला प्राप्त होईल. यंदा दिवाळी पूर्व सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे.

 

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा अशी मागणी सर्वस्तरावर जोर धरू लगली आहे. यात आमदार विक्रम काळे मागे राहिले नाही. त्यांनी देखील पत्र पाठवून सातवा वेत लागू करण्याबाबत विचारणा केली असता वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी हे उत्तर दिले आहे. याचा राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यात जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी, पोलिस, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

बातम्या आणखी आहेत...