आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६ जूनला सीए संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्लांची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादच्या चार्टर्ड अकाउंटंट संघटनेच्या वतीने १६ व १७ जून रोजी आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद््घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सीए संघटनेचे अध्यक्ष सचिन लाठी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 


सातारा परिसरात सीए संघटनेचे मोठे कार्यालय आहे. येथे १६ व १७ जून रोजी प्रॅक्टिसिंग सीएसाठी दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे. यात जीएसटी, ई-वे बिल, प्राप्तिकरासंदर्भातील नवे कायदे आदी विविध विषयांवर सीए गिरीश आहुजा, बिमल जैन, अविनाश पोद्दार, हिमांशू किशनवाला, योगेश थार, अॅड. कपिल गोयल हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा व विदर्भासह देशभरातून ७५० पेक्षा जास्त सीए सहभागी होतील. या वेळी सीए संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड, अनिल भंडारी, मंगेश किनारे, विभागीय सीए संघटनेचे अध्यक्ष संदीप जैन यांचीही उपस्थिती राहणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...