आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लेखान्यात तणावामुळे रात्रीतून बंदोबस्त वाढवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळेत सिल्लेखान्यात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला. पोलिसांना माहिती देतो या संशयावरून चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर हा जमाव क्रांती चौक पोलिस ठाण्यात जमा झाला. 


एमएच-२० सीएच -७३९१ हा तोडफोड झालेल्या गाडीचा क्रमांक असून श्रीनिवास धुप्पड असे गाडीच्या मालकाचे नाव आहे. साडेदहाच्या सुमारास सिल्लेखाना परिसरात या गाडीची तोडफोड झाली. या घटनेनंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात सिल्लेखान्यातून मोठा जमाव जमला होता. आमच्यावर हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, मनीष कल्याणकर, राजश्री आढे, मधुकर सावंत, प्रेमसागर चंद्रमोरे घटनास्थळी आले. तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दोन्ही गटांचे लोक रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात होते. मात्र रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. पोलिसांनी सगळ्यांना शांततेचे आवाहन करत शहरात बंदोबस्त वाढवला. शहरातील संवेदनशील भागाची जबाबदारी पोलिस निरीक्षकांवर देण्यात आली आहे. दरम्यान, जमावाने घटनास्थळी गेलेल्या पोलिसांवर चाल करून हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...