आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident: दोन एसटी, शिवशाही आणि कंटेनरचा भीषण अपघात, 12 प्रवासी जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड- औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माळीवाडी गावाजवळ दोन एसटी, शिवशाही बस व कंटेनरच्या अपघातात १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. 

 

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर चौपदीकरणाचे काम सुरु आहे. माळीवाडी गावाजवळ औरंगाबाद-उदगीर बस खराब झाल्यामुळे उभी होती. या बसवर मागील बाजुने औरंगाबाद-तुळजापूर बस आदळली. त्यापाठोपाठ औरंगाबाद-बीड शिवशाही बसही दोन्ही बसवर आदळली. हा अपघात झाला असताना तिन्ही बसला कंटेनर जाऊन भिडला. कंटेनर चालकाने मद्यप्रशान केल्याचे आढळून आला.


सोमवारी औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चारपदरी रोडचे काम सुरू असल्यामुळे वन वे आहे. या ठिकाणी माळीवाडी गावाजवळ औरंगाबाद -उदगीर एसटी(एमएच २० एन ९७५२) खराब झाल्यामुळे एसटी उभी होती. पाठीमागून औरंगाबाद- तुळजापूर (एमएच ४०,एन ९७५२) ही एसटी व तिच्या मागून शिवशाही बस औरंगाबाद-बीड विनाथांबा (एमएच ०६, बीडब्ल्यू ०४९१) येत होती. त्याच वेळेला दारू प्राशन केलेल्या कंटेनर (एचआर ३४३७) चालकाने कंटेनर जोरात चालवून पाठीमागून एकापाठोपाठ तीन एसटी एकमेकांना धडकल्या. यात एसटीमधील प्रवासी मनोज दत्तात्रय बागले(४२, रा. सांधवी), शाहनाज बागवान( ५०, रा, गंगापूर), एकनाथ बाबूराव पवार(४५, रा.माहेरभायगाव), नवाब लाेनवाल(५३, रा. गंगापूर), एहसान शेख(२१, रा. गेवराई), दुर्गा संजय म्हस्के( ३५, औरंगाबाद), इंदूबाई बाबुराव पन्हाळे(५०,चिंचखेडा), गोवर्धन मुकुंद वाघमारे(५५, औरंगाबाद), विशाल श्याम निलापले (२४, रा. औरंगाबाद), समृद्धी राहुल कांबळे ( ५, रा. औरंगाबाद), नागोराव भानुदास पन्हाळे( ६५, चिंचखेड), इंदाबाई वामन घुले(७०, सिरसगाव) हे जखमी झाले. त्यांना मिळेल त्या वाहनाने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले. काही जखमींना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद जामखेड व पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... दोन एसटी बस, शिवशाही बस आणि कंटेनरच्या भीषण अपघाताचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...