आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेचा पाडवा.. divyamarathi.com सोबत मराठी नववर्षाचे काव्यमय स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'जिकडे तिकडे शहरात, नाचू लागला कचरा। वॉर्डा-वॉर्डाचा केला उकंडा, गाजू लागला कचरा।' शहराच्या दयनीय अवस्थेचे वर्णन विलास फुटाणे यांनी कवितेतून केले. सामाजिक आशयापासून राजकारण, युतीवर भाष्य करणाऱ्या कविता divyamarathi.com च्या वतीने आयोजित 'कवितेचा पाडवा' या काव्य मैफलीत नामवंत कवींकडून सादर करण्‍यात आल्या.

 

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आयोजित 'कवितेचा पाडवा' या काव्य मैफलीत डॉ. ललित अधाने, रवी कोरडे, वीरा राठोड, डॉ. विष्णू सुरासे, कवयित्री माधुरी चौधरी, वात्रटिकाकार विलास फुटाणे, चक्रधर डाके, ध.सू.जाधव यांनी सहभाग घेतला. कवी नीलेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

 

मराठवाडा एक्स्प्रेस डॉ. विष्णू सुरासे यांच्या हास्यकवितांनी अंतर्मुख केले तर चक्रधर डाके आणि धसू जाधव या नव्या दमाच्या कवींनी शेतकऱ्यांनी रक्ताळलेल्या पायांनी काढलेल्या मोर्चाने तरी सरकारला जाग येईल का, असा थेट सवाल केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला 'कवितेचा पाडवा' या विशेष कार्यक्रमात नामवंत कवींची रंगलेलीी काव्य मैफल... 

बातम्या आणखी आहेत...