आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AURANGABAD: कचरा प्रश्न पुन्हा पेटला, स्वच्छता निरीक्षकासह सफाई कामगारांना मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील कचराप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. नारेगावाकडे कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना चिखलठाणा भागात अडविण्यात आले. संतप्त नागरिकांकडून कचरा संकलण करणार्‍या गाड्या फोडण्यात आल्या. तसेच स्वच्छता निरीक्षकाला नागरिकांनी बेदम कारहाण केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ही घडली.

 

महापालिकेच्या वार्ड क्र.6 चे स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कामगाराला चिकलठाणा परिसरात नागरिकांकडून बेदम मारहाण करण्‍यात आली. महा‍पालिकेच्या वतीने नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍याचे काम सुरु आहे.

 

सफाई कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. महापालिकेच्या कचरा संकलण करणार्‍या गाड्‍याही फोडण्यात आल्या आहेत. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...