आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसुतीसाठी माहेरी गेली पत्नी, महापालिकेच्या कर्मचाऱ्याने घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापालिकेच्या कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी शिवाजी नगर भागात उघडकीस आली.  राहुल अशोक जाधव (वय-28) या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.


या बाबत नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जाधव यांच्या पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेलेल्या होत्या . घरी ते त्यांच्या खोलीत एकटेच होते. आज सकाळी  भावाने अनेक आवाज दिल्या नंतर देखील जाधव हे प्रत्युत्तर देत नसल्याने त्याच्या खोली कडे जाऊन पाहिले असता त्यांनी छताला गळफास घेतल्याचे दिसून आले या प्रकरणी जवाहरनागर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची  नोंद करण्यात आली आहे, जाधव यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. राहूल हा वार्ड अ कार्यालयात सफाई मजूर म्हणून काम करत होता. सध्या त्याच्याकडे जन्म मृत्यु विभागात इनवर्ड, आऊटवर्ड करण्याचे काम होते. त्याच्या मृत्युचे कारण मात्र अजून स्पष्ट होवू शकले नाही पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...