आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • औरंगाबादेत मोठा शस्त्र साठा जप्त; खेळण्यांच्या नावाखाली Online खरेदी केल्या तलवारी Aurangabad Police Seized Swords Stocks In Jai Bhawani Nagar

औरंगाबादेत मोठा शस्त्र साठा जप्त; खेळण्यांच्या नावाखाली Online खरेदी केल्या तलवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील जय भवानी नगर आणि नागेश्वरवाडीत क्राईम ब्रॅंचने सोमवारी रात्री धडक कारवाई करत मोठा शस्त्र साठ जप्त केला आहे. त्यात 12 तलवारी आणि 13 चाकूंचा समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

खेळण्यांच्या नावाखाली ऑनलाइन खरेदी केल्या तलवारी...

खेळणीच्या नावावर ही शस्त्रे 'फ्लिफकार्ट'वरून     मागविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 12 तलवारी, 13 चाकू, 1 गुप्ती, 1 कुकरी जप्त केली आहे.

 

चिरंजीव प्रसाद आज स्वीकारणार पदभार
तब्बल अडीच महिने रिक्त असलेल्या औरंगाबाद शहराच्या पोलिस आयुक्तपदी अखेर चिरंजीव प्रसाद यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी निघाले. ते आज (मंगळवार) पदभार स्वीकारतील.

प्रसाद सध्या नांदेड परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकपदी आहेत. ते 1996 सालच्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून 2002 ते 2004 या कालावधीत औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी काम केले आहे. त्यांनी जालन्यातही पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...