आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • औरंगाबाद दंगल..महिलांनी व तरुणांनी घोषणा देत पोलिस स्टेशनच्या दिशेने फेकल्या बांगड्या Aurangabad Violence Clash Between Two Groups

Aurangabad Violence: औरंगाबादेत पुन्हा तणाव, महिलांनी घोषणा देत पोलिसांवर फेकल्या बांगड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात गेल्या महिन्यात उसळलेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी काही तरुणांना अटक केली आहे. याला विरोध करण्यासाठी सिटी चौक पोलिस स्टेशनसमोर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिलांचाही सहभाग होता. महिलांनी ‍घोषणा देत पोलिस स्टेशनच्या दिशेने बांगड्या फेकल्याची माहिती मिळाली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, दंगलीप्रकरणी  जामीन मिळालेल्या तिघांना पोलिसांनी पुन्हा अटक केली. या विरोधात आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात सिटी पोलिस स्टेशनवर धडक मोर्चाचा काढण्यात आला. पोलिस कारवाई चुकीची असल्याचा आरोप आमदार जलील यांनी केला आहे.

 

कायदा हातात घेऊ नका.. शहरात जमाव बंदी

पोलिस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला आहे. जमावात काही महिलांचाही सहभाग आहे. महिलांसह पुरुष पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत अाहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी जमावाला आवाहन केले आहे की, कायदा हातात घेऊ नका. संपूर्ण शहरात जमाव बंदी लागू करण्‍यात आली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...