आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Aurangabad Voilence: दंगलीचा तपास थंडावला..मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही हवेत, नुकसान भरपाई नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राजा बाजार, शहागंज आणि नवाबपुरा परिसरात  झालेल्या दंगलीला दोन महिने पूर्ण झाले आहेत. दंगलीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात पोलिसांच्या व्यासपीठावर येणार आहेत. शनिवारी (7 जुलै) पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पोलिस महासंचालक पदाचा नुकताच पदभार घेतलेले दत्ता पडसलगीकर यांच्यासह, मंत्री आणि पोलिस खात्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची  उपस्थिती असणार आहे.

 

विशेष म्हणजे यावेळी शहरातील सर्व पक्षीय नेते देखील एकाच व्यासपीठावर असणार आहे. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, डॉ. रणजीत पाटील, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगांवकर, महापौर नंदकुमार घोडेले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, गृह विभागाचे अप्पर महासचिव सुनील पोरवाल, पोलिस गृह निर्माण विभागाचे महासंचालक बिपीन बिहारी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे व एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांच्यासह शहरातील सर्व आमदारांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

 

पोलिसांची चौकशी थंडवली
11 मेच्या रात्री झालेली दंगलीत 60 पेक्षा अधिक दुकाने जळाली व त्यांची तोडफोड झाली. 100 पेक्षा अधिक वाहने जळाली. तर दोन जणांचा मृत्यु झाला.  दंगल रोखण्यात आम्ही अयशस्वी ठरलो, पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कमकुवत ठरली.  या बाबत पोलियांची अतिरीक्त पोलिस महासंचालक पदाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र ही चौकशी देखील थंडावली आहे.  शहरात चार महिन्यात पाच दंगली  झाल्या आहेत. कचरा, भीमा कोरेगावच्या घटनेचे पडसाद  आणि महापुरुषांचे पोस्टर फाडल्यावरुन झालेली तोडफोड. मिट मिट्याच्या दंगलीनंतर तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. शिवाय या दंगलीची नि:पक्ष चौकशी होईल असे आश्वासन देण्यात आले होते. 

 

दोन महिने झाले तरी नुकसान भरपाई नाही
जुन्या शहरात झालेल्या दंगलीला दोन महिने झाले तरी अजून शासनाकडून कुठलीही भरपाई देण्यात आली नाही. पोलिस आणि महसूल विभागाकडून पंचनामे झाले आहेत. त्याचा अहवाल देशील शासनाला पाठवण्यात आला. मात्र अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. काही राजकीय पक्ष आणि संघटनानी तोडीफार आर्थिक मदत केली तेवढेच.

 

तपास थंडावला
नेमकी दंगल कोणामुळे झाली. दंगलीची पूर्व तयारी होती का, या प्रश्नांची उत्तरे अजूनही पोलिस तपसातून पुढे आली नाही. आता पर्यंत ६० जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक शिवसेना तर एक एमआयएम नगर सेवकाचा समावेश आहे. यातील बहुतांश संशयित जामिनावर सुटले आहेत. मात्र तपास अजून पुढे सरकलेला नाही. आठ दिवसांपूर्वी सात संशयितांना एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केल्याचे  कारण पुढे करत एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील आणि कार्यकर्त्यांनी तब्बल पाच तास सिटीचौक बंद केले होते. अशा घटनांमुळे अजुनही शहर धुमसतच आहे. मात्र प्रशासनाकडून अजूनही कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.
 
समिती आली नी गेली
28 जून रोजी तत्कालीन पोलिस महासंचालक सतीश चंद्र माथुर यांचे पथक मिटामिटा दंगलीची चौकशी करण्यासाठी शहरात आले होते. या  पथकाने आयजी कार्यालयात बसूनच ही चौकशी केली.  चौकशीसाठ बोलवण्यात आलेल्या नागरीकांनाच माथुर यांनी असे नगरसेवक  का निवडून देतात असा सवाल केला. त्यावेळी सबंधित नगसेवकही त्याच दालनात होते. हे वाक्य ते चांगलेच ओशाळले. या समितीकडून ठोस काही निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा असणाऱ्या नागरीकांना केवळ आश्वासनावरच परतावे लागले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीचा भीषणता दर्शवणारे फोटो

 

बातम्या आणखी आहेत...