आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- अध्यात्मिक संत भय्यू महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून इंदूर (मध्यप्रदेश) येथे आत्महत्या केली. इंदूरमध्ये राहत्या घरी त्यांनी स्वतःवर गोळी झाडली होती. त्यांना तातडीने बॉम्बे हॉसिपटलमध्ये हलविण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
भय्यूची महाराज यांचे मूळ नाव उदयसिंग देशमुख असे होते. ते अनेक ट्रस्टचे संस्थापक होते. परंतु मागील काही दिवसांपूर्वी स्वत:ला कर्जबाजारी घोषित केले होते. कर्जातून आलेले नैराश्य आणि कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे.
एप्रिल 2017 मध्ये डॉ.आयुषीसोबत घेतले सातफेरे
भय्यू महाराज एप्रिल 2016 मध्ये दुसर्यांदा विवाहाच्या बंधनात अडकले होते. डॉ.आयुषीसोबत त्यांनी सातफेरे घेतले आहे. इंदूर येथील सिल्व्हर स्प्रिंग क्लब हाऊसमध्ये भय्यू महाराज यांच्या दुसर्या लग्नाचा आशीर्वाद समारंभ पार पडला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... कोण होती भय्यूजी महाराजांची पहिली पत्नी?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.