आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार प्रशांत बंब - अधिकाऱ्यात वाद; व्हिडिअाे झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अामदार प्रशांत बंब व पाेलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्यातील वादाचा व्हिडिअाे व्हायरल झाला अाहे. यात अामदार बंब हे इंगळे यांना अवैध धंद्यांबद्दलच्या कारवाईसंदर्भात विचारणा करताना दिसत असून, उपनिरीक्षक इंगळे हेही अामदारांना उत्तर देताना दिसत अाहेत.      


गुरुवारी गंगापूर तहसील कार्यालयात बैठकीचे अायाेजन केले हाेते. यानंतरच या वादाला सुरुवात झाली. अापण शासनाच्या ज्या कमिटीवर अाहाेत त्या कमिटीतील अधिकारानुसार अापल्याला थेट कारवाई करण्याचे अधिकार असल्याची समज अामदार बंब देत असल्याचे व्हिडीओतून दिसते.


तपासणीच्या नावावर वसुली   

कायदेशीर कारवाई करण्यासाठी गंगापूर शहरात ४२ ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांची यादी पोलिसांना काही महिन्यांपूर्वी दिली होती. त्यानंतरही त्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांच्यामुळे नागरिक त्रस्त झाला असून वाहनधारकांकडून तपासणीच्या नावाखाली पैसे घेणे, मारहाण करणे, एसडीएम साहेबांनी पकडलेली वाळूची गाडी सोडून देणे अशी कृत्ये करीत असून त्यांच्या सर्व कारनाम्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे बंब यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणानंतर जिल्हाभरात खळबळ माजली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...