आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत चार्ली पोलिसाने स्वत:ला घेतले पेटवून; 21 मार्चला अनिलचे लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मयुरपार्क परिसरातील पार्वती हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या एका चार्ली पोलिसाने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. अनिल घुले (वय 25) या तरुन चार्ली पोलिसाचे नाव आहे.

 

प्रत्यक्षदर्शी सतीष सुधाकर दौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पार्वती अपार्टमेंट परिसरात नित्य नियमाने गेले होते. त्यावेळी अनिल घुले हे पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडले. आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिक जमले. नागरिकांनी ब्लॅंकेट टाकून अनिलला आगलेली आग विझवली.

 

भाजलेला अनिल 'मी चार्ली पोलिस आहे माझ्या मित्रांना लवकर बोलवा' अशी वणवणी करत होता. नागरीकांनी 108 ची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने खासगी वाहन चालकाच्या विनवण्या करत अनिल यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी 100 टक्के भाजले असल्याचे पोलिसांना कळवले आहे. सध्या घाटीत अनिलवर उपचार सुरु आहेत. अनिल घुले यांच्या सोबत त्यांची आई राहते. तर येत्या 21 मार्चला अनिलचे लग्न होते, अशी माहीती परिसरातील नागरीकांनी दिली.  


100, 108 ची पोलिसालाही मिळाली नाही मदत 
अनिल घुले हे चार्ली पोलिस आहेत. त्यांना मदतीसाठी नागरीकांनी तासभर 108 रुग्णावाहीका व 100 नंबरवर कॉल केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याची माहीती प्रत्यक्षदर्शी दौड यांनी दिली. त्यांनी सात ते आठ वेळ 100 नंबर डायल केला. शिवाय 108 च्या रुग्णवाहीकेला कॉल केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दुर्घटनेत पोलिसालाही शासकीय मदत उपलब्ध होऊ न शकल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...