आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर 2 महिन्यांनी औरंगाबादला मिळाले Police Commissioner; चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/मुंबई- दोन महिन्यांनंतर अखेर औरंभागाबादला पोलिस आयुक्त मिळाले आहेत. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

दरम्यान, मागील आठवड्यापासून चिरंजिव प्रसाद यांच्या नियुक्तीबाबत सोशल मीडियात चर्चा सुरू होती. सोमवारी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. चिरंजीव प्रसाद यांना अाज (सोमवार)         नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे.

 

आधी कचरा प्रश्न आणि नंतर उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तात्काळ पोलिस आयुक्त द्यावा, अशी मागणी राजकीय पक्षाकडून होत होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येणार्‍या गृह विभागाने चिरंजीव प्रसाद यांना नियुक्ती पत्र दिले दिले आहेत.

 

कोण आहेत चिरंजीव प्रसाद?
- चिरंजीव प्रसाद हे 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
- बिहार आणि छत्तीसगडमध्ये राबविण्यात आलेल्या अ‍ॅन्टी नक्षल ऑपरेशनचे ते प्रमुख होते.
- औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी 2002 मध्ये काम केले होते.
- जालना पोलिस अधीक्षक, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी त्यांची बदली करण्यात आली होती.
- केंद्रीय राखीव पोलिस दलातही त्यांनी विशेष कामगिरी केली होती.
- मागील दोन वर्षांपासून ते नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी कार्यरत होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... चिरंजीव प्रसाद यांना प्राप्त झालेले नियुक्ती पत्र..

 

बातम्या आणखी आहेत...