Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Congress MLA Abdul Sattar Comment on CM For Maratha Reservation at Aurangabad

लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही..तर आम्ही डिसेंबरपर्यत आंदोलन करणार- अब्दुल सत्तार

प्रतिनिधी | Update - Aug 06, 2018, 07:38 PM IST

लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही असा टोला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे

  • Congress MLA Abdul Sattar Comment on CM For Maratha Reservation at Aurangabad

    औरंगाबाद- मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरपर्यत आरक्षण देणार, असे सांगितले आहे. त्यावर मुख्यमंत्री नोव्हेंबर म्हणत असतील तर आम्ही डिसेंबर महिना संपेपर्यत मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार आहोत. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही असा टोला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून कॉग्रेसचे चक्री उपोषण सुरु आहे.

    पाचव्या दिवशी चक्री उपोषणाच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड,शहराध्यक्ष नामदेव पवार,जगन्नाथ काळे यांच्यासह अनेक कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेशाची कॉपी दिल्यानंतर आंदोलन संपणार
    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉग्रेसचे पाच दिवसापासून आंदोलन सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी नोव्हेबर पर्यत आरक्षणासाठी वेळ लागणार असे सांगितल्यामुळे कॉग्रेस किती दिवस करणार याची चर्चा सुरु होती.यावेळी सत्तार यांना विचारले असता मराठा समाज तसेच धनगर कोळी समाजाच्या भावाना आरक्षणासाठी तिव्र झाल्या आहेत.जोपर्यत आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही तोपर्यत चक्री उपोषण सुरु राहणार आहे. ज्या दिवशी जिल्हाधिकारी आरक्षणाच्या अध्यादेशाची कॉपी देतील त्याच दिवशी फटाक्या वाजवून या आंदोलनाची सांगता होईल असे सत्तार यांनी सांगितले.

Trending