आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे मंत्री म्हणाले..मनुष्याची उत्पत्ती माकडापासून झालीच नाही, डार्विनचा उत्क्रांतिवाद चुकीचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माकडापासून मनुष्याची तयार झालाच नाही, डार्विनचा उत्क्रांतिवाद खोटा आहे. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातून तो काढला पाहिजे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंह यांनी सांगितले. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आज (शुक्रवार) 18 व्या अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे उद्घाटन डॉ.सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सत्यपाल सिंह बोलत होते.

 

डॉ.सिंह म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात वेदही शिकवायला हवे. केंद्र सरकार याबाबत विचाराधीन असून लवकरच नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. यावेळी व्यासपीठावर करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी.ए.चोपडे, पोलिस आयुक्त यशस्वी यादव आदी उपस्थित होते.

 

...तर मुलांना जन्मताच जंगलात पाठवा!
देशातील बहुतांश विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना चुकीचे शिक्षण दिले जात असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले. मनुष्याची माकडांपासून उत्पत्ती झाली. जंगलात पशु-प्राण्यांचे आवाज ऐकून मनुष्य बोलायला शिकला, असे सर्रास चुकीचे शिकविले जात आहे. पशु-प्राण्यांपासून मनुष्य बोलायला शिकला असल्याचे सांगणार्‍यांनी त्यांच्या मुलांना जन्मताच जंगलात पाठवावे, असा उपरोधिक सल्लाही सिंह यांनी दिला आहे.

 

प्रत्यक्षात मनुष्याची उत्पत्ती ही माकडांपासून नव्हे, तर मनुष्यापासूनच झाली आहे. माकडांपासून उत्पत्ती झाली, अशी शिकवण देणार्‍यांची निर्मिती कदाचित माकडांपासून झाली असावी, अशी टीका डॉ. सिंह यांनी केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... सिंह म्हणाले, वेदाचा अभ्यासक्रमांत समावेश

बातम्या आणखी आहेत...