आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.ईश्वरसिंग मंझा यांना अटक करण्यात आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे आणि धनादेश अनादर प्रकरणी डॉ.मंझा यांच्यावर अटकेची कारवाई करण्‍यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयात नोकरी लावून देतो असे सांगून मंझा यांनी तक्रारदाराकडून सहा लाख रुपये घेतले होते.

 

काय आहे हे प्रकरण?

तक्रारदार देवराव चव्हाण (रा.चिकलठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महाविद्यालयात कारकूनपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ईश्वरसिंग मंझा यांनी सहा लाख रुपये घेतले होते. परंतु नोकरी लागली नाही. परिणामी चव्हाण पैसे परत मागितले असता मंझा यांनी दोन धनादेश दिले. मात्र ते वटले नाहीत. नंतर चव्हाण यांनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मंझा यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी मध्यरात्री इटखेडा परिसरातून अटक केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. डॉ.ईश्वरसिंग मंझा यांनी स्वत:च्या उत्तरपत्रिकेत खाडाखोड करून वाढवून घेतले होते गुण.. 

बातम्या आणखी आहेत...