आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • मुलीने दिला बोलण्यास नकार..मुलाने फेसबूकवर बनविले बनावट अकाऊंट, दिली धमकी Fake Facebook Account Of Girl

मुलीने दिला बोलण्यास नकार..मुलाने फेसबूकवर बनविले बनावट अकाऊंट, दिली धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुलीने बोलण्यास नकार दिल्याने तिच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट तयार करुन तिच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपी आकिफ शेख मुख्तार अहेमद (रा. सिल्क मिल कॉलनी) याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारदार महिलेची मुलगी काही दिवसांपूर्वी वडिलांसोबत ट्युशनला जात होती. या वेळी आकिफने तिचा पाठलाग केला. हा प्रकार वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याला समजावून सांगितले. तेव्हा त्याने असे पुन्हा करणार नाही, असे कबूल केले. परंतु काही दिवसांनी त्याने मुलीच्या नावाने फेसबूकवर बनावट अकाऊंट तयार केल्याचे लक्षाात आले. हा प्रकार त्यानेच केल्याचा आरोप मुलीच्या आईने तक्रारीत केला आहे. पुन्हा मुलीचे आई-वडील त्याला यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले असता त्याने त्यांच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...