आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतील वाजपेयी..अटलजींच्या वक्तव्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा झाला होता पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर सातत्याने निवडून यायचे. राज्यासह दिल्लीतही त्यांचे सर्वच राजकीय पक्षात चांगले संबंध होते. मात्र लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी करायचाच, असा चंग राज्यातल्या नेत्यांनी बांधला होता. त्यातूनच 1996 सालच्या लोकसभा निवडणूकीत चाकूरकरांविरोधात गोपाळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. गोपीनाथ मुंडेसह तत्कालीन भाजप नेत्यांनी चाकूरकरांच्या पराभवासाठी जबरदस्त फिल्डिंग लावली होती.

 

गोपाळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अटलबिहारी वाजपेयी यांचा सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत वाजपेयींनी अर्धा तास राजकीय भाषण केले. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांनी सरतेशेवटी लातूरमधील काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर हे एक चांगले व्यक्तीमत्व असून आपले चांगले मित्र असल्याचे वक्तव्य केले. त्या सभेनंतर वाजपेयींच्या या वक्तव्याची इतकी चर्चा झाली की, त्याचा फायदा काँग्रेसच्या चाकूरकरांनाच झाला आणि भाजप उमेदवार पराभूत झाला. वाजपेयींच्या निखळ, निरागस आणि अजातशत्रू व्यक्तीमत्वाचा परिचय तेव्हा लातूरकरांना आला होता.

 

विवेकानंद रूग्णालयाचा शिलान्यास
लातूर येथील विवेकानंद रूग्णालयाच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमासाठी अटलबिहारी वाजपेयी 21 मार्च 1982 रोजी लातूरला आले होते. लातूरच्या सिग्नल कॅम्प भागात डॉ. अशोक कुकडे यांच्या पुढाकाराने विवेकानंद रूग्णालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. त्याच्या इमारतीचे काम त्यावेळी वेगाने सुरू होते. पुढच्या काळात विवेकानंद रूग्णालयाने नेत्रदीपक प्रगती केली.

 

बातम्या आणखी आहेत...