आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तरुणासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- तालुक्यातील वडनेर येथील एका १८ वर्षीय तरुणीला गावातील एका तरुणाकडून एकतर्फी प्रेमातून वारंवार लग्नाची मागणी होत होती. या त्रासामुळे  सदर तरुणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या  आपली जीवन यात्रा संपवली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याच्या आईवर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


तालुक्यातील वडनेर येथील मीराबाई विलास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील रामानंद विजय राठोड हा अश्विनी विलास चव्हाण हीस माझ्यासोबत लग्न कर म्हणून सतत छेड काढायचा.  तर माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणून त्याची आई मंजुळा विजय राठोड ही  मानसिक त्रास देत होती. त्यामुळे १८ एप्रिल रोजी १२ वाजेच्या सुमारास अश्विनी चव्हाण हिने  राहत्या घराच्या आड्यास ओढणीने गळफास घेतला. तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

तर जीव वाचला असता 
 तालुक्यातील वडनेर येथे ३० मार्च रोजी ग्रामीण पोलिस निरीक्षक मारुती पंडित यांनी गावात बाजार कमिटी वसुलीवरून वाद झाल्याने गावात बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. तेव्हा त्यांनी गावातील महिला व मुलींना काही त्रास, अडचण असेल तर  निःसंकोचपणे पोलिस कर्मचाऱ्याशी संपर्क करा, असे आवाहन  केले होते.  या बैठकीला अश्विनी  व तिची आई मीराबाई  या उपस्थितीत होत्या. मात्र समाजात बदनामी होईल म्हणून दोघींनी तोंड बंद ठेवले.  त्याच वेळी पंडित यांच्या आवाहनाला या दोघींनी प्रतिसाद दिला असता तर आरोपीवर कारवाई होऊन अश्विनीचा जीव वाचला असता. या पुढेही महिला व मुलींना कोणाचा  त्रास असेल तर त्यांनी   पोलिस ठाण्यात संपर्क करावा किंवा वुमन हेल्पलाइन ०२४०२३९२१०० किंवा ९७६३७७६६४४  या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून तक्रार करावी असे आवाहन पोलिस निरीक्षक मारुती पंडित यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...