आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील ऐतिहासिक महेमुद दरवाजाचा काही भाग कोसळला..पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यात गुरुवारी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. वीज कोसळल्याच्या विविध घटनांमध्ये एकूण 15 जणांचा मृत्यू झाला तर नाल्यात वाहून गेल्याने औरंगाबाद शहरात एकाचा मृत्यू झाला.

 

दुसरीकडे, शहरातील पवनचक्की परिसरातील ऐतिहासिक महेमुद दरवाजाच्या काही भाग आज (शुक्रवार) सकाळी सात वाजता कोसळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाज्याचा कोसळलेला भाग बाजूला गेला.

 

नाल्यात पडून एकाचा मृत्यू
गुरुवारी मध्यरात्री शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते.  सिडकोतील एन-6 भागात लक्ष्मीदेवी मंदिराजवळील नालाही ओेव्हरफ्लो झाला होता. मध्यरात्री 12 च्या सुमारास चेतन रत्नाकर चोपडे (38, टेलिकॉम सोसायटी एम सेक्टर एन-6) हे बुलेटवरून (एमएच 20 डीएच 8501) बजरंग चौकातून घरी जात असताना त्यांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते बुलेटसह नाल्यात पडले. दरम्यान, नगरसेवक शिवाजी दांडगे व मकरंद कुलकर्णी यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने अग्निशामन दल व महापालिकेच्या पथकाला पाचारण केले. चोपडे यांचे आधारकार्ड पाण्यावर तरंगत होते. त्यावरून त्यांची ओेळख पटली. बचाव पथकाने पाऊणतास शोध घेतल्यानंतर चोपडे यांचा मृतदेह सापडला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... औरंगाबादेतील ऐतिहासिक महेमुद दरवाजाचे फोटो

बातम्या आणखी आहेत...