Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Kakasaheb Shides Name of Kaygaon Toka Bridge On Godawari River

मराठा मोर्चाकडून कायगाव टोकाच्या पुलाला काकासाहेब शिंदेंचे नाव; पुलावर झाला दशक्रिया विधी

प्रतिनिधी | Update - Aug 02, 2018, 07:02 AM IST

कायगावच्या पूलाला त्याचे नाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले, तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला.

 • Kakasaheb Shides Name of Kaygaon Toka Bridge On Godawari River

  नेवासे- मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणाऱ्या गंगापूर येथील काकासाहेब शिंदेच्या दहाव्याचा कार्यक्रम बुधवारी कायगाव टाेका येथे झाला. शिंदेने ज्या ठिकाणी जलसमाधी घेतली हाेती त्या कायगावच्या पुलाला त्याचे नाव मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने देण्यात अाले. तसा फलकही या ठिकाणी लावण्यात अाला.


  काकासाहेब शिंदेने २३ जुलै राेजी कायगावातील गाेदापात्रात जलसमाधी घेतली हाेती. त्या वेळी या ठिकाणी संतप्त जमावाने माेठ्या प्रमाणावर ताेडफाेड केल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. नगर-अाैरंगाबादकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली हाेती. या पार्श्वभूमीवर बुधवारी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानेही कायगाव टाेका भागात माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. नगर-अाैरंगाबाददरम्यान धावणाऱ्या गाड्याही शेवगावमार्गे वळवण्यात अाल्या हाेत्या. सुदैवाने दिवसभर या भागात काेणतीही अप्रिय घटना घडली नाही.
  कायगाव हे अाैरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या हद्दीवर अाहे. बुधवारी अाैरंगाबादच्या हद्दीत ८०० पाेलिस अधिकारी व ३०० कर्मचारी तैनात हाेते. नेवासा (जि. नगर) हद्दीत १२० पाेलिस व ५ अधिकारी तैनात हाेते. शिंदेच्या दशक्रिया विधीसाठी राज्यभरातील मराठा माेर्चाचे समन्वयक व कार्यकर्ते माेठ्या संख्येने कायगावात अाले हाेते. स्थानिक लाेकप्रतिनिधींना मात्र सुरक्षेच्या कारणास्तव येणे टाळले. यापूर्वी शिंदेच्या अंत्यविधीसाठी अालेले शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना जमावाच्या राेषाला सामाेरे जावे लागले हाेते. कायगाव टोका येथे साेमवारी व मंगळवारी झालेल्या हिंसक अांदाेलनप्रकरणी ७६ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यापैकी ३१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल अाहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा माेर्चाकडून केली जात अाहे.


  १२३ बसफेऱ्या रद्द, दुपारनंतर सेवा सुरळीत
  दशक्रिया विधी कार्यक्रमाच्या निमित्ताने अाैरंगाबादहून नगरकडे जाणाऱ्या एसटी बस व वाहतूक गाड्या पैठण, शेवगावमार्गे वळवण्यात आल्या होत्या. गंगापूरसाठी लासूरमार्गे बस सोडण्यात आल्या. सायंकाळी चार वाजेपर्यंत १ हजार २५ फेऱ्यांपैकी ९०२ फेऱ्याच पूर्ण झाल्या, तर १२३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. लांबचा प्रवास आणि भाड्यात झालेली वाढ प्रवाशांना परवडणारी नव्हती, त्यामुळे प्रवासी संख्यादेखील घटली. मात्र दुपारनंतर कायगाव मार्गदेखील मोकळा झाल्याने बससेवा सुरळीत झाली. जेथे अनुचित प्रकार घडल्याची माहिती मिळेल त्या मार्गावरील बससेवा खंडित केली जाईल, हे धोरण सध्या एसटी प्रशासन अवलंबत आहे.

Trending