आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पद्मावत'वरून राष्ट्रीय करणी सेना संतप्त, औरंगाबादेत मल्टिप्लेक्स व्यवस्थापनांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/शिरपूर- संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपटाला सुप्रीम कोर्टाने सर्वत्र रिलीज करण्‍यास परवानगी दिल्‍यानंतर करणी सेना संतप्‍त झाली आहे. येत्या 25 जानेवारीला हा सिनेमा रिलीज करण्‍यात येणार आहे. परंतु औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात पद्मावत सिनेमा प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश महासचिव देविचंदसिंह बारवाल यांनी दिला आहे. आज (गुरुवार) शहरात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापनांना निवेदन दिले.

 

दुसरीकडे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पद्‍मावत सिनेमाला कडाडून विरोध करण्‍यात आला. राजपूत समुदायाकडून मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गावर दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्‍यात आली.

 

पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी..
करणी सेना राष्ट्रपतींकडे दाद मागणार असल्याचे सूतोवाच करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडावी, अन्यथा आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सेनेने दिला आहे.

 

24 जानेवारीला जोहार...
'पद्मावत'वर बंदी घातली नाही तर चित्तोडगड (राजस्थान) येथे क्षत्राणी (राजपूत महिला) जोहार करतील, असा इशारा राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटार (चित्तोडगड) यांनी दिला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..