आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन, शीख धर्माला मान्यता, मग लिंगायत धर्माला का नाही, माता महादेवीजी कन्नडमध्ये भाषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे आयोजित लिंगायत धर्म महामोर्चा विभागीय आयुक्तलयावर पोहोचला आहे. मोर्चाचे सभेत रुपांतर झाले आहे.  सरकारचा दोष नाही, आम्हीच आवाज उठवला नाही. हिंदू हा धर्मच नाही. हिंदू ही संस्कृती आहे, राष्ट्र आहे. आम्ही राष्ट्राचे मालक आहोत. आमचा धर्म लिंगायत आहे. आमच्या धर्माला मान्यता द्या, नाही तर सरकारला झोप येऊ देणार नाही, असा इशारा 103 वर्षीय शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर यांनी केंद्राला इशारा दिला.

 

जैन, शीख धर्माला मान्यता मिळाली, मग लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा का नाही, माता महादेवीजी यांनी मागणी केली. विशेष म्हणजे महादेवीजी यांनी कन्नड भाषेत भाषण केले. 

 

बसवेश्वर जयंतीला घरावर लिंगायत धर्माचा ध्वज फडकवा..
दिल्लीत लवकरच रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याच माता महादेवजी यांनी सांगितले. तसेच येत्या 18 एप्रिलला बसवेश्वर जयंती आहे. या  दिवशी घरावर हा लिंगायत धर्माचा ध्वज फडकवण्याचे आवाहनही त्यांनी केले. लिंगायत धर्माची मान्यता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली होती. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्यावा, या मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला मराठा सेवा संघाने पाठिंबा दर्शवला आहे. मोर्चात हजारों च्या संख्येने महिला-पुरुष समाजबांधव सहभागी झाले आहेत. 'मी लिंगायत..माझा धर्म लिंगायत', 'एक लिंगायत कोटी लिंगायत', 'भारत देशा जय बसवेशा', 'लिंगायत धर्माला मान्‍यता मिळालीच पाहिजे', अशा घोषणा दिल्या जात आहेत.

 

शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि माते महादेवी बंगळुरु यांच्‍या मार्गदर्शनाखाली मोर्चाला सुरूवात झाली. महापौर नंदू घोडेले आमदार सुभाष झांबड क्रांती चौकात भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे.

 

भाजप आमदार अतुल सावे, भागवत कराड, माजी महापौर बापू घडामोडे, बसवराज मंगरूळे यांनी भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे.  दरम्यान, मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी शनिवारी जनजागृती वाहन रॅली आकाशवाणी चौकापासून काढण्यात आली. क्रांती चौकमार्गे ही रॅली पैठण गेट आणि शहरातील विविध भागात जाऊन मोर्चासाठी आवाहन करण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... लिंगायत समाजाच्या मोर्चाचे फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...