आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदनापूर- औरंगाबाद येथील एका प्रेमी युगुलाने तालुक्यातील दावलवाडी फाटयाजवळ पाण्याच्या बाटलीत विषारी औषधी मिसळून प्राशन करून आत्म्हत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली असून प्रेमी युगुल 14 फेब्रुवारीपासून औरंगाबाद येथून बेपत्ता होते. दरम्यान 15 फेब्रुवारी रोजी युवतीच्या वडीलांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सीटी चौक पोलिस ठाण्यात दिलेली होती.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद येथील कोमल अशोक गरुड (वय - 17) व शशांक सुभाष जैस्वाल (वय 21) या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याने ते 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेनटाईन डेच्या दिवशीच घरातून निघून गेले होते. कोमल घरी न आल्याने तिच्या पालकांनी 15 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील सिटी चौक् पोलिस स्टेशन गाठून आमच्या मुलीचे शशांक जैस्वाल याने अपहरण केल्याची तक्रार नोंदविल्यावरून जैस्वाल विरुदध भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी बदनापूर तालुक्यातील दावलवाडी फाटयाजवळ मृत अवस्थेत अनोळखी युवक - युवतीचे प्रेत आढळून आले व बाजूला विषारी औषध मिश्रीत बिसलरी बॉटल सापडल्या. सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर सदरील युवक - युवती औरंगाबाद येथून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असता पोलिसांनी सिटी चौक् पोलिस स्टेशनला माहिती कळविल्यानंतर मृत कोमलचा भाऊ बदनापूर येथे आला असता सदरील प्रेताची ओळख पटली. मृत कोमल व शाशांक असल्याचे आढळून आली. बाजूलाच एक चिठठी सापडली असून त्यात आम्ही दोघे जण आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
कोमल गरूड ही युवती औरंगाबाद येथील एस. बी. महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. मुळची नांदगाव येथील असून औरंगाबाद येथे शिक्षणासाठी काकांकडे नारळीबाग येथे राहत असल्याची माहिती समजते. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस उपनिरीक्ष्क अविनाश नळेगांवकर, बाबासाहेब गायकवाड, दिलीप जगदाळे यांनी भेट देऊन प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या बाबत बदनापूर पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश नळेगांवकर हे करीत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.