आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SUICIDE: वैजापुरात प्रेमीयुगुलाने एकाच ओढणीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - गंगापूर हमरस्त्यावरील जांबरगाव येथे दोघेही रहिवासी दोन्ही युवक-युवतीचे प्रेम सबंध जुळले होते. घरच्या कडून प्रेमविवाह करण्यास समंती मिळणार नाही. यामुळे दोघांनी सोमवारी दुपारपासून घर सोडले होते. राञी उशिरा पर्यंत दोन्ही तरुण तरुणीच्या कुटुंबांतील सदस्यानी मुले घरी न आल्याने परिसर तसेच नातलगाकडे राञभर शोधाशोध केली. मंगळवारी सकाळी ९:३० वाजे सुमारास खंबाळा शिवारातील संचेती फार्म हाऊस जवळील एका झाडाला प्रेमी युगुलानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

 

या घटनेची महिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता सदरील दोन्ही मृत प्रेमी युगल जांबरगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले.जिल्हा परिषद सदस्य प्रा.रमेश बोरनारे, अतुल निकोले, संतोष गायके आदीने घटनास्थळी धाव घेत झाडावर लटकलेले मृतदेह नागरिकाच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात नेले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केला.याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

ताटातूट होवू नये म्हणून दोघांनी जीव दिला...
एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेल्या युगलाने घरुन प्रेमविवाहाला कदापि मान्यता मिळणार नाही याची जाणीव होती.त्यातच साक्षीच्या कुंटुबांतील सदस्यानी तिच्या विवाहाची हालचाली सुरु केली होती.पुढील आठवड्यात तिचा साखरपुडा करण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे दोघांनी प्रेमसबंधात कायमची ताटातूट होवू नये म्हणून दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल त्यांनी उचलले असल्याची चर्चा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...