आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: औरंगाबादेत उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द..शिवसेनेचे अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला घातली लाथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- क्रांती चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आंदोलनात सहभागी होऊन ठिय्या मांडला. यादरम्यान काही आंदोलकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढले. जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने दानवे यांचा पारा चढला. त्यामुळे आंदोलक, दानवे व दानवे समर्थकांत धक्काबुक्की झाली. घोषणा देणाऱ्या तरुणांपैकी देवा नामक तरुणाला अंबादान दानवेंनी लाथ घातली. त्यामुळे वातावरण तापले. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि दानवे यांना तेथून तत्काळ बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

मारहाणीत जखमी झालेल्या देवाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, देवा हा मूळ अंबडचा असून त्याला मारहाण झाल्याचे कळताच त्याचे कुटुंबीय शहराकडे निघाले होते. काही वेळाने दानवे यांनी आपल्या कार्यालयासमोरच ठिय्या मांडला.

 

काय म्हणाले अंबादास दानवे..
'मी कोणत्याही आंदोलनांवर राग काढत नाही. मी पहिल्या दिवसांपासून मराठा आंदोलनात सहभागी आहे. जेव्हा औरंगाबादमध्ये पहिला मोर्चा निघाला होता. तेव्हा मी आंदोलनात सहभागी झालो होतो. मी शिवसैनिकही आहे. शिवसैनिक असलो तरी गुरुवारी आंदोलनात अत्यंत शांतपणे सहभागी झालो होतो. सकाळी आंदोलनात सहभागी झालो तेव्हा काही तरुण हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द वापरून घोषणाबाजी करत होते. त्यामुळे मी उत्तर दिले', असे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी‍ दिले आहे.

 

अंबादास दानवे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या विरोधात काहीही खपवून घेणार नाही. जे काही होईल त्या परिणामांना मी सामोरे जाण्यास तयार आहे. मराठा समाजातील तरुण उद्धव ठाकरेंचा आदर करतो. पण आंदोलनात कुणी बाहेरचा प्रवृत्तीचा घुसून मुद्दाम घोषणाबाजी केली असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होती. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलले झाली. पण आंदोलनाचे केंद्र बिंदू असलेल्या औरंगाबादेत आंदोलनाला हिंसक वळण लागले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सोशल मीडियावर व्हायरल झालेला 'तो' व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...