Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Maharashtra Bandh for Maratha Reservation in Marathwada Live Updates

मराठवाड्यात आंदोलन पेटले..नांदेडमध्ये तहासिलचे रेकॉर्ड रूम जाळले, पूर्णा येथे रेल्वेच्या काचा फोडल्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 10, 2018, 07:19 AM IST

रेल्वेगाड्या अडवणे व दगडफेक झाल्याने दक्षिण मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या.

 • Maharashtra Bandh for Maratha Reservation in Marathwada Live Updates

  नांदेड- महाराष्ट्र बंदचा रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला. रेल्वेगाड्या अडवणे व दगडफेक झाल्याने दक्षिण मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या. काही गाड्या उशिराने धावत आहेत. गाडी क्रमांक ५७५४० परळी अकोला, गाडी क्रमांक ५७५८३ अकोला-पूर्णा आणि गाडी क्रमांक ५७५१२ परभणी-नांदेड या तीन सवारी गाड्या रद्द करण्यात आल्या. तर गाडी क्रमांक ५७५५४ आदिलाबाद-परळी सवारी गाडी पूर्णा-परळी दरम्यान तर गाडी क्रमांक ५७५४१ नगरसोल-नांदेड सवारी गाडी परभणी नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक ५७५६२ मनमाड-काचीगुडा सवारी गाडी परभणी ते काचीगुडा दरम्यान रद्द, ह्या गाडीचा रेक गाडी क्रमांक ५७५६१ बनून परभणी-मनमाड अशी धावेल.

  गाडी क्रमांक ५७५६१ काचीगुडा-मनमाड सवारी गाडी नांदेड-मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली. ह्या गाडीचा रेक गाडी क्रमांक ५७५६२ बनून नांदेड-काचीगुडा अशी धावेल. गाडी क्रमांक १२७६६ अमरावती-तिरुपती एक्स्प्रेसवर काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनास लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तसेच नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल देखील झाले.

  तपोवन एक्स्प्रेस तीन तास थांबवली
  नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस चुडावा-पूर्णा दरम्यान ३ तास थांबवली गेली, तसेच नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस आणि अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस ह्या दोन्ही गाड्या औरंगाबाद रेल्वे स्थानकावर २ तासापासून थांबून ठेवल्या होत्या. अमरावती तिरुपती एक्स्प्रेस चुडावा-नांदेड दरम्यान १ तास थांबवण्यात आली.

  लोहा येतील तहसिल कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

  जिल्ह्यातील लोहा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. लोहा येतील तहसिल कार्यालयातील रेकॉर्ड रूम रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात जातीच्या संचिका जाळण्यात आल्या आहेत.

  दुसरीकडे, संतप्त आंदोलकांनी उमरीच्या रेल्वे स्टेशनवर तोडफोड केली. तसेच बसस्थानकात घुसून बसच्या काचा फोडल्या. पान टपरी आणि खिचडी विक्री करणार्‍या 4 हॉटेल जाळल्याच्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे.

  सेनगावात बोलेरो जाळली...
  मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने आज 9 ऑगस्ट रोजी चक्का जाम, बाजारपेठा बंद असे आंदोलन छेडण्यात आले आहे. सेनगावात आंदोलकांनी स्कूल बस जाळल्याची ताजी असताना रस्त्यावरील बांधकामाच्या कामावर असलेली मध्यप्रदेश राज्यातील बोलेरो गाडी अज्ञात आंदोलकांनी फुकून दिल्याची हिंसक घटना घडली आहे. एका गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन सेनगाव तालुक्यात हिंसक वळण घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नांदेड नाक्यावर शेकडो मराठा युवकांनी शासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन सुरू केले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू असलेले मुंडण आंदोलन दुपारी 1 वाजेपर्यंत सुरूच होते.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मराठा आंदोलानात झालेल्या तोडफोडीचे फोटो...

Trending