Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Maratha Reservation Otherwise leave the Shiv Sena MLA Harshvardhan Jadhav

सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्याने शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 08:37 AM IST

कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

 • Maratha Reservation Otherwise leave the Shiv Sena MLA Harshvardhan Jadhav

  औरंगाबाद- कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ईमेलने राजीनामा सादर करत ते मुंबईला रवाना झाले आहेत. सरकारने मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढत आरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच सरकार ऐकत नसेल तर मराठा आरक्षणासाठी इतर सदस्यांनी राजीनामे देण्याची मागणी त्यांनी केली आहे.


  जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी संध्याकाळी चार वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदारकीचा राजीनामा दिला . मी २५ जुलैपासून मध्यान्हपूर्व/मध्यान्हानंतर विधानसभेतील माझ्या जागेचा राजीनामा सादर करत आहे, अशा आशयाचे दोन ओळींचे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना ईमेलद्वारे पाठवले आहे.


  राजीनामा रिजेक्ट करू नका
  जाधव म्हणाले की, सामाजिक कार्यासाठी राजीनामे दिले होते. दोनदा माझा राजीनामा फेटाळला आहे. गंभीर प्रश्नावर राजीनामा देण्याची पद्धत मीच सुरू केली आहे. शिवसेनेचे इतर आमदार, मंत्री आरक्षणासाठी राजीनामा देणार का, याबाबत विचारले असता मला त्याबाबत कल्पना नाही. शिवसेनेने आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.


  तिसऱ्यांदा दिला जाधवांनी राजीनामा
  जाधव यांनी यापूर्वी त्यांना मारहाण झाल्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राजीनामा दिला होता, तर कन्नड मतदारसंघातील रस्त्यांची कामे होत नसल्यामुळे विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. आता तिसऱ्यांदा त्यांनी राजीनामा दिला आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिलेले राजीनामा पत्र

 • Maratha Reservation Otherwise leave the Shiv Sena MLA Harshvardhan Jadhav

Trending